29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home गुन्हेवार्ता जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने शेतकरी जागीच ठार

जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने शेतकरी जागीच ठार

0
40

गडचिरोली,दि.04: मुलचेरा तालुक्यातील खुदीरामपल्ली येथे शेताला पाणी देण्यास गेलेल्या शेतकऱ्याच्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श होऊन तो जागीच गतप्राण झाल्याची घटना आज बुधवारला सकाळी ७ च्या सुमारास घडली.बुधवारी सकाळी जगबंधू जुगल सूत्रधार व दुलाल मनोरंजन पाल हे दोघेजण कापसाच्या शेताला पाणी देण्यासाठी गेले होते. आॅईल इंजिनच्या सहाय्याने शेतीला ते पाणी देत असत. यापैकी दुलाल पाल हे इंजिनकडे गेले तर जगबंधू सूत्रधार हे आपल्या शेतातील बादली आणण्यासाठी जात असताना वाटेत असलेले तारेचे कुंपण ओलांडत असताना त्यांना विजेचा धक्का बसला व ते जागीच ठार झाले.

blank