
आमगाव,दि.04ः तालुक्यातील किडगींपार गावातील ऐका शेतकर्यांने शेतात दोन दोन हातपंप खोदूनही पाणी लागत नसल्याच्या त्रासाला कंटाळून आणि आर्थिक फटका सहन झाल्याने खचून जाऊन विष प्राशन करून आत्ममहत्या केल्याची घटना घडली आहे. अनंतराम लोटनजी हरिणखेडे वय ५५ वर्षे असे या शेतकर्याचे नाव आहे .
आममगाव तालुक्यापासून अवघ्या दोन किलो‘मीटर अंतरावर किडगींपार या गावातील शेतकरी अनंतराम लोटनजी हरिणखेडे आपल्या दोन एकर शेतात भाताची शेती करून म्हतारी आई , पत्नी व दोन ‘मुले यांचा उदरनिर्वाह करीत असत. भाताच्या शेती करिता पावसाची सोय नसल्यामुळे चार पाच वर्षांपूर्वी बोरवेल्स खोदून शेतीला थोडाफार पाणी पुरवीत असत. परंतु या बोरवेल्स ला सुद्धा पाणी येत नसल्यामुळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतून कर्ज काढून नवीन बोरवेल्स खोदण्याचा निर्णय घेतला. शेतात पहिली बोरवेल्स ४००फुट आतपर्यंत खोदूनही पाणी लागले नाही. त्यामुळे त्यांनी शेतात दुसर्या ठिकाणी दुसरी बोरवेल्स खोदली परंतु त्या बोरवेल्सला ३५० फुट खोल खोदूनही पाणी लागला नाही.त्यामुळे ते ‘मागील काही दिवसापासून मानसिक तणावामध्ये होते.त्यातच ३ डिसेंबरला सकाळी शेतात जातो असे सांगून ते शेतात गेले व ११ वाजे दरम्यान शेतात विष प्राशन करून ते घरी परत आले. घरी कुणालाही काही न सांगता ते झोपी गेले. परंतु काही वेळातच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.




