29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ पदवीधर नोंदणीसाठी मतदारात जागृती करा – जिल्हाधिकारी

पदवीधर नोंदणीसाठी मतदारात जागृती करा – जिल्हाधिकारी

0
36

भंडारा  दि. 5 :- 1 जानेवारी 2020 या आर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम व 1 जानेवारी 2019 या आर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदार संघ नाव नोंदणीसाठी मतदारात जागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिल्या. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली  बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पदवीधर मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 9 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हयातील सर्व पदवीधर व्यक्ती या यादीत नाव नोंदवू शकतात. यासाठी ऑनलाईन तसेच सर्व तहसिल कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त लोकांनी पदवीधर मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी या बैठकीत आवाहन करण्यात आले आहे.

नमुना 18 दिनांक 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत स्विकारण्यात येईल. त्यानंतर स्विाकरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अर्जासोबत विद्यापीठाने दिलेली पदवी किंवा पदवीका प्रमाणपत्र, गुणपत्रिका व एक पासपोर्ट साईज फोटो सादर करणे आवश्यक आहे. नमुना 18 मध्ये अर्ज पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे सादर करावा. नमुना 18 मधील छापील अर्ज सहाय्यक मतदान अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात प्राप्त होईल त्यासह हस्तलिखीत, टंकलिखित, चक्रमुद्रित किंवा खाजगीरित्या छापील अर्ज देखील स्विकारले जातील.

विद्यापीठ किंवा संबंधित संस्था यांनी दिलेले मुळ पदवी, पदविका प्रमाणपत्र किंवा यथोचितरित्या स्वयंसाक्षांकित आणि यथोचितरित्या कोणत्याही अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी जो तहसिलदार, शासकीय पदवी महाविद्यालय, आंतर महाविद्यालय यांचे प्राचार्य, मुलींचे शासकीय पदवी महाविद्यालय, आंतर महाविद्यालय यांचे प्राचार्य, सर्व गटाचे गट विकास अधिकारी, नगरपालिका, नगरपंचायतीचे (राजपत्रित) कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हयाचे सर्व राजपत्रित अधिकारी, करार व दस्त ऐवजांवर दाखले देणारा अधिकारी ( नोटरी पब्लीक ) यांनी यथोचितरित्या प्राधिकृत केलेली प्रत.

गट्टा पध्दतीने अर्ज सादर करता येणार नाही. परंतु कुटूंबप्रमुख त्यांच्या कुटूंबातील, कार्यालय प्रमुख किंवा संस्था प्रमुख त्यांच्या स्थापनेंतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रित करुन पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे सादर करु शकतात. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पदनिर्देशित अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे कार्यालयात पदवीधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरच्या यादीमध्ये कुठल्याही प्रकारचे चूका ( जसे नावात, पत्त्यात, लिंगात बदल ) असल्यास त्याबाबत कळविण्यात यावे, असे म्हंटले आहे.

blank