चंद्रपूर,दि.05ः गडचांदूर परिक्षेत्राचे उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या नेतृत्वात आणि ठाणेदार गोपाल भरती यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार ४ डिसेंबर रोजी ४९ लाख ४१ हजार १२0 रुपयांची देशी, विदेशी अवैध दारू न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करण्यात आली.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी संजय आकेवार तसेच उत्पादन शुल्क व स्थानिक पोलिस कर्मचार्यांची उपस्थिती होती.तीन महिन्यापूर्वी ठाणेदार भारती याठिकाणी रुजू झाल्यापासून २८ सप्टेंबर रोजी ७३ व आता दुसर्यांदा ५0 लाखांच्या जवळपास विविध गुन्ह्यात पकडलेली अवैध दारू नष्ट करण्यात आली. कोरपना तालुका हा यवतमाळ,आदिलाबाद या जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने गडचांदूर शहरात सहजपणे अवैध दारूची वाहतूक होत असते.आजपयर्ंत पोलिसांनी हजारो दारूच्या कारवाया केल्या आणि कारवाईचे सत्र सतत सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे.





