25.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home रोजगार/व्यापार इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व्याज परतावा योजना

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व्याज परतावा योजना

0
37

गोंदिया दि.0६ :: महाराष्ट्र शासनाने ओबीसी प्रवर्गातील बेरोजगार युवकांकरीता तसेच व्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांकरीता व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय महामंडळामार्फत राबविण्याचे ठरविले आहे. व्यवसायाकरीता बँकेकडून 10 लक्ष रुपये पर्यंतच्या मर्यादीत घेतलेल्या कर्ज रकमेवर द.सा.द.शे.12 टक्के मर्यादीत पाच वर्षापर्यंत महामंडळ व्याज परतावा करेल.

यासाठी अर्जदार इतर मागावर्गीय प्रवर्गात मोडत असावा. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. वय 18 ते 50 वर्ष असावे. कर्ज खाते आधार कार्डाशी लिंक असावे. अर्ज करतेवेळी शासनाच्या तसेच इतर महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा. कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. महामंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी अनिवार्य. लाभार्थ्याने नियमीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज परतावा दिला जाणार नाही. अर्ज करण्याकरीता तसेच इतर माहितीकरीता www.msobcfdc.org या संकेतस्थाला भेट देवून व्याज परतावा योजनेला क्लिक करा तसेच काही अडचणी उदभवल्यास जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या,गोंदिया कार्यालयाशी संपर्क साधावा.