37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ओबीसी जनगणनेसाठी लाखनी तहसिलादांरांना निवेदन

ओबीसी जनगणनेसाठी लाखनी तहसिलादांरांना निवेदन

0
27

blank

लाखनी,दि.07ः- 2021 ला ओबीसींची जनगणना करण्यात यावी तसेच त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रपत्रात ओबीसींचा रखाना तयार करण्यात यावे या मागणीचे निवेदन लाखनी तालुका ओबीसी जनगणना परिषदेच्यावतीने लाखनीच्या नायब तहसीलदारांना देण्यात आले.निवेदनात ओबीसी बांधवाची 1931 पासून ओबीसींची जनगणना झाली नसून स्वतंत्र भारतातही 7 जनगणना झाल्या पण ओबीसींची जनगणना तत्कालीन सरकारने केलेली नाही.परिणामी ओबीसींची या देशात लोकसंख्या किती याची नेमकी आकडेवारी भारत सरकारकडे नसल्यानें ओबीसींना शासन,प्रशासन व शिक्षणात योग्य प्रमाणात आरक्षण व प्रतिनिधित्व मिळाले नाही.संविधानात असलेले आरक्षण मिळू शकले नाही.करीता येत्या 2021 ला देशाची 8 वी जनगणना होत असून त्या जनगणनेचे काम येत्या मार्च महिन्यापासून सुरु होणार असल्याने या जनगणनेत ओबीसींची जनगणना करण्यासाठी  जनगणना परिपत्रकात एससी,एसटी प्रमाणे ओबीसींचा स्वतंत्र रखाना ठेऊन ओबीसींची जनगणना करण्यात यावे असे म्हटले आहे.हे  निवेदन नायब तहसीलदार श्रीमती दोनोडे यांनी स्विकारले असून निवेदन देतांना ओबीसी जनगणना परिषदेचे संयोजक प्रा उमेश सिंगणजुडे,प्रा अशोक गायधनी ,गोपाल नाकाडे,प्रा विलास लांजेवार ,प्राचार्य सुधीर काळे ,प्रा भास्कर गिर्हेपुंजे , गोपीचंद फेंडर ,मधूकर मोहतुरे, संतोष सावरकर ,अनिल गिर्हेपुंजे,प्रा नलिनी गिर्हेपुंजे व इतर ओबीसी बांधव उपस्थित होते.

blank