24.5 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

0
38

वाशिम, दि. 07 : मातृभूमीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे महान कार्य देशाच्या शूर सैनिकांवर आहे. युद्ध व युद्धजन्य परिस्थितीत तसेच अतिरेकी कारवायांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आत्मबलिदान करून वीरगती लाभलेल्या भारतीय लष्करातील शूरवीर जवानांच्या बलिदानाची सर्व नागरिकांना जाणीव राहावी आठवण राहावी. यासाठी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 चा निधी संकलन शुभारंभ 7 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक भगवान मापारी यांनी सशस्त्र सेना ध्वज लावून कार्यक्रमाची सुरुवात केली.या कार्यक्रमाला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक नरेंद्र वाघमारे, श्री. रामधन राऊत, श्री. डोंगरदिवे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे श्री. माधव शिंदे, श्री. गजानन कव्हर, श्री. प्रताप काळे, श्री. अनिल चौधरी, श्री. दिनेश आपटे, श्री. संतोष रोडगे, श्री. जीवन मोरे यांचेसह अनेक माजी सैनिक यावेळी उपस्थित होते.