28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ चान्ना बाक्टी शिवारात बिबट्याचा मृतदेह आढळला

चान्ना बाक्टी शिवारात बिबट्याचा मृतदेह आढळला

0
32

गोंदिया,दि.08ः अर्जुनी मोर तालुक्यातील चान्ना बाक्टी शिवारातील एक शेतात ६ डिसेंबर रोजी सायंकाळी बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान  ७ डिसेंबर रोजी नवेगावबांध वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मात्र, त्याचा मृत्यूचे कारण कळू शकले नाही.
चान्ना बाक्टी येथील शेतकरी राजाराज फागू डोंगरवार यांच्या शेतात ६ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अलका गोवर्धन झोळे व शोभा मनोहर लोगडे हे काही कामानिमित्त गेले असता त्यांना बांबुच्या झुडपात बिबट असल्याचे दिसले. बिबट जीवंत असल्याचा समज झाल्याने ते भीतीपोटी गावाकडे पळाले व शेतात बिबट असल्याची माहिती पसरली. रात्रभर भीतीच्या वातावरणात काढल्यानंतर शनिवारला सकाळी नवेगावबांध वनविभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे सहायक वनसंरक्षक डी.व्ही.राऊत यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे, वनरक्षक एस. एम. शेंडे, पी.डब्ल्यू.मेर्शाम, एम. टी. चव्हाण, आर. सी. परसगावे, क्षेत्र सहाय्यक एस. एच. शेंडे यांनी घटनास्थळ गाठले व मृत बिबट्याला बांबूच्या झुडपातून बाहेर काढले. बिबटचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून पोटावर गंभीर जखमा आहे. तर बाबूंच्या झुडपापासून २१ मीटर अंतरावर बिबट्याचे केस व रक्त आढळल्याने विद्युत विभागाच्या कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले.
त्यांनी पाहणी केल्यावर विद्युत स्पशार्ने बिबट्याचा मृत्यू नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे कळू शकले नाही. डॉ. खोडसकर यांनी सदर बिबट हा मादा असून अंदाजे ५ वषार्चा असल्याचे सांगितले. दरम्यान, येथे मृतावस्थेत आढळलेले मादा बिबट ६ डिसेंबर रोजी पिंपळगाव खांबी येथे झाडावर आढळलेल्या बिबट्याच्या पिल्लाची आई तर नसावी, अशी चर्चा परिसरात आहे.