गोरेगांव,दि.08ःःगोरेगांव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा हिरडामालीच्या विद्यार्थ्यांनी 6डिसेंबर रोजी तालुक्यातील कंटगी मध्यम प्रकल्पाला भेट देत भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिनाचे औचित्य साधून अभिवादन केले.याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका नाननबाई बिसेन होत्या.प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन समीती अध्यक्ष राखीलाल येडे, उपाध्यक्ष महेश कुंभलकर ,सदस्य दशरथ टेंभरे,सदस्य चंद्रसेन पटले,सदस्या वंदना ठाकूर,सदस्या नंदेश्वरा राऊत,सदस्या उषा राऊत ,सदस्या बिसेनताई ,शिक्षक एस.आर.बघेले,शिक्षक व्हि.टी.पटले,शिक्षक अजय तितिरमारे,शिक्षक क्रांतीलाल पटले उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी,आपले जिवन व्यतित करतांना परमपुज्य डाॅ.बाबासाहेब यांचा आदर्श घेतला पाहिजे असा सल्ला मान्यवरांनी दिला.या प्रसंगी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.प्रास्ताविक शिक्षक सुरेश बघेले यांनी केले तर संचालन शिक्षिका कु.साधना पारधी व आभार शिक्षिका सौ.छाया पारधी यांनी मानले.
कार्यक्रमानंतर,कंटगी जलाशयाचे दर्शन ,सिंचन क्षमता,ओलीताचे क्षेत्र,जलाशय बांधणीचा इतिहास विद्यार्थ्यांनी समजुन घेतला.जलशुध्दीकरण प्रकल्पाला भेट देत तिथे कार्यरत अधिकारी श्री.ठाकरे यांनी जलशुध्दीकरण पध्दती समजावली,वनसंपदा,विविध जातीचे वृक्ष,औषधी वनस्पती यांची सखोल माहीती प्रात्यक्षिका सह विद्यार्थ्यांना दिली.
सहभोजना नंतर क्षेत्रभेट संपन्न झाली. यशस्विते साठी श्रीमती राधन वाघाडे,केशर बाई राऊत, अनिता हरिणखेडे यांनी सहकार्य केले.




