बुलडाणा,दि.08: दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये सहाय्यक आयुक्त असलेल्या सुमन चंद्रा यांची बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी म्हणून सहा डिसेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र कॅडरच्या तीन अधिकाऱ्यांची बदली झाली असून त्यात चंद्रा यांचाही समावेश आहे.बुलडाणा येथील जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे या कार्मिक शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्त ब्रिटनमधील लंडन स्कूल आॅफ इकोनॉमिक्स येथे पब्लीक अॅडमनिस्ट्रेशनचा अभ्यास करण्यासाठी सुमारे दोन महिन्यासाठी रजेवर गेल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे बुलडाणा येथील जिल्हाधिकारी पदावर दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आयुक्त कार्यालयात कार्यरत सुमन चंद्रा यांची तिथे बदली करण्यात आली आहे.




