29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ प्रख्यात विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखेंचा १0,11 व 12 डिसेंबरला चंद्रपूर,गडचिरोली,गोंदियात सत्कार

प्रख्यात विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखेंचा १0,11 व 12 डिसेंबरला चंद्रपूर,गडचिरोली,गोंदियात सत्कार

0
92

चंद्रपूर/ गडचिरोली/गोंदिया,दि.09: प्रसिद्ध विद्वान, प्राच्च विद्या पंडीत, साठ वर विचार प्रवर्तक पुस्तकांचे लेखक व महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ.आ.ह. साळूंखे (सातारा) यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्याबद्धल त्यांच्या साहित्य व विचाराप्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रा. डॉ.आ.ह.साळूंखे अमृत महोत्सव सत्कार समितीच्या वतीने चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहात 10 डिसेंबर ला सायंकाळी 5 वाजता सत्कार आयोजित केला आहे. या प्रसंगी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील परिवर्तनवादी चळवळीचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती सत्कार समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बळीराज धोटे यांनी कळविले आहे.

डॉ.आ.ह.साळुंखे चंद्रपूर येथे 1998 पासून विविध कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रपूरात आले आहेत. त्यांनी लिहिलेल्या साठवर पुस्तकातील विचारामूळे बहुजन समाजाला आपले डोके आपल्या धडा वर ठेवून धूर्त व चालबाज लोकांच्या तावडीतून सुटण्यास मदत झाली आहे.अश्या या महान विचारवंत व प्राच्च विद्या पंडीत डॉ.आ.ह.सरांच्या सत्कार सोहळ्याला चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने उपस्थित राहून डॉक्टर साळुंखे सरांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन स्वागताध्यक्ष बळीराज धोटे यांनी केले आहे.

गडचिरोली-त्याचप्रमाणे ख्यातनाम पुरोगामी विचारवंत व लेखक प्रा.डॉ.आ.ह.साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार बुधवारी ११ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता गडचिरोली येथील सेलिब्रेशन फंक्शन हॉल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीचे पांडुरंग नागापुरे व प्रा.शेषराव येलेकर यांनी दिली.पांडुरंग नागापुरे व प्रा.येलेकर यांनी सांगितले की डॉ.आ.ह.साळुंखे हे महाराष्ट्राच्या समाज जीवनाला परिचीत असलेले सामाजिक समतेच्या लढाईतील उत्तुंग व्यक्तीमत्व आहे. तत्वज्ञान, इतिहास व संस्कृतीच्या क्षेत्रातील त्यांचे संशोधनकार्य अतुलनीय आहे. अध्ययनास बंदी असलेल्या संस्कृत भाषेवर डॉ.साळुंखे यांनी प्रभुत्व प्राप्त करुन वैदिक वाड्:मयाची चिकित्सा केली. एकूणच त्यांची तळमळ ही समतावादी चळवळीस दिशा निर्देशक ठरत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अमृतमहोत्सवी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.उद्धव डांगे, गौतम डांगे, अमिता मडावी, जनार्धन ताकसांडे, पुरुषोत्तम ठाकरे, सुरेश लडके, हरिदास कोटरंगे, उद्धव बांगरे, चंद्रकांत शिवणकर उपस्थित होते.

गोंदिया-प्रसिद्ध विद्वान साहित्यिक, 60 वर विचार प्रवर्तक पूस्तकांचे लेखक, महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.आ.ह. साळुंखे यानी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या साहित्य व विचारांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी अमृत महोत्सव सत्कार समितिच्या वतीने गोंदिया येथील बुद्धीस्ट समाज संघ संथागार क्रिडा संकुल रोड मरारटोली येथील सभागृहात गुरुवार दि 12 डिसेंबर ला दुपारी 3 वाजता डॉ. आ.ह.साळुंखे यांचा जाहिर व्याख्यान व सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. या सत्कार सोहळ्याला अधिकाधीक उपस्थितीचे आवाहन जिल्ह्यातील जनतेला आयोजन सत्कार समितीमध्ये सहभागी मराठा सेवा संघ, ओबिसी सेवा संघ, संविधान मैत्री संघ, बुद्धीस्ट समाज संघ, संभाजी ब्रिगेड, नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड, युवा बहुजन मंच, ओबिसी संघर्ष कृती समिति, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति, अवंतीबाई लोधी महासभा या संघटनांनी केली आहे.