29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी,अधिकारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित

राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी,अधिकारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित

0
48

गडचिरोली,दि.९: राष्ट्रीय ओबीसी महासंघप्रणीत राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी, अधिकारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली असून, विलास मस्के यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्याम लेंडे व महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजेश दरेकर यांच्या उपस्थितीत रविवारी(दि.८) गडचिरोलीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत ओबीसी कर्मचारी, अधिकारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. या कार्यकारिणीचा कार्यकाळ ३ वर्षे असणार आहे.

कार्यकारिणीत अध्यक्ष-विलास  मस्के, सरचिटणीस-बंडू सातपुते , कोषाध्यक्ष-निलेश नैताम, सचिव-दुर्वास ठाकरे, सहसचिव-प्रकाश माकोडे, उपाध्यक्ष-सुधाकर दिवटे,  संजय घुबडे,  खुशाल चौधरी, नारायण ठाकरे, राजेश्वर कुनघाडकर,  लोमेश मशाखेत्री  व ज्येष्ठ सल्लागार  म्हणून राजेश  दरेकर, चंद्रकांत शिवणकर, दत्तराज नरड, उद्धव डांगे , पांडुरंग नागापुरे, सुरेश लडके  यांचा समावेश आहे.

blank