गोंदिया,दि.10ःःमासेमारी करणार्या समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे.ही अवस्था चिंताजनक आहे.शिक्षणामुळे जीवनातील गुंतागुंतीच्या अनेक समस्या व प्रश्नांना भिडण्याची क्षमता येते.म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन संघर्ष वाहिनीचे विदर्भ संयोजक दीनानाथ वाघमारे यांनी केले.
भोई-ढिवर समाज संघटना जिल्हा गोंदियातर्फे स्थानिक भावभूती रंगमंदिरात ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता माजी प्राचार्य माणिक गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विवाहयोग्य युवक-युवती परिचय मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. लक्षणीय उपस्थिती पाहून त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. प्रा.शुभांगी मेर्शाम,प्रा.डॉ.दिशा गेडाम, शिक्षिका संगीता मेर्शाम,परेश दुरुगवार, संजय केवट आणि उदघाटक माजी उपजिल्हाधिकारी एम.टी. वलथरे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.याप्रसंगी मंचावर नवृत्त कार्यकारी अभियंता केशवराव मडावी,डॉ. एम.बी. मौजे, नवृत्त पोलीस निरीक्षक मादेशीवार, रामदासजी शेंडे, रमेश मेर्शाम, पो.पा. श्रीपतजी नागपुरे, विनोद मेर्शाम,विस्तार अधिकारीद्वय वलथरे व श्रीराम मारबते, उमराव मांढरे,शिक्षिका रंजना कांबळे, सौ. सुनीता नान्हे,भाऊलाल तुमसरे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
प्रारंभी उदघाटक एम.टी. वलथरे आणि सर्व अतिथी यांच्या हस्ते मत्स्य सहकार महर्षी,स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा माजी खासदार दिवंगत जतीरामजी बर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करण्यात आले. या मेळाव्यात ८३ युवक युवतींनी आपला परिचय अगदी बिनधास्तपणे दिला.
प्रारंभी समाज संघटनेचे उपाध्यक्ष दिनेश दुधबुरे व जयेंद्र बागडे तसेच सचिव यशवंत दिघोरे,सहसचिवबालचंद केवट व लक्ष्मण नान्हे यांनी सर्व पाहुण्यांचा परिचय करीत सर्वांचे स्वागत केले. समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हौसलाल वलथरे यांनी आयोजनामागील भूमिका मांडली.या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन युवा कार्यकर्ते मनोज मेर्शाम व आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष मनिराम मौजे यांनी केले. आयोजन संयोजक दिगंबर नगरे,संघटक अनिल बागडे, सुकलाल उके, देवीलाल केवट, कोमेश कांबळे, देवलाल शेंडे,नंदू उके,यांनी पर्शिम घेतले.





