26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन,दोन दिवस विविध कार्यक्रम

श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन,दोन दिवस विविध कार्यक्रम

0
76
OLYMPUS DIGITAL CAMERA

गोंदिया,दि.10 : श्री संत गाडगेबाबा तथा तुकडोजी महाराज विश्वस्त मंडळ सुर्याटोलाच्या वतीने निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या ६३ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन १४ व १५ रोजी स्थानिक सूर्याटोला येथे करण्यात आले आहे.कार्यक्रमाची सुरुवात शनिवार, १४ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता दीपप्रज्वलन करून करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक सुनील भालेराव यांच्या हस्ते, नगरसेविका गौशीया शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून के.बी. चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७ वाजता सामूहिक प्रार्थना व हभप हरिभाऊ इंझोरीकर महाराज, चुन्नीलाल घोरमारे महाराज, चमरू बिसेन, बिसेन महाराज, गीता भजन मंडळ मजीतपूर, नानीकराम टेंभरे हे संगीतमय किर्तन सादर करणार आहेत. तर १५ डिसेंबरला सकाळी ९ वाजता शोभायात्रा, दुपारी १ वाजता गोपालकाला तद्नंतर दहीहांडी पूजन, आरती व सायंकाळी ६ वाजतापासून महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विनोद अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, माजी नगरसेवक खालीदभाई पठान प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या पुण्यतिथी महोत्सवाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष हरिभाई पटेल, उपाध्यक्ष विठ्ठल मुंदडा, कोषाध्यक्ष मुलचंद रहांगडाले, सचिव मुकेश चन्ने, सहसचिव श्रीकांत क्षत्रिय, संचालक डॉ.हरिनारायण चौरसिया, डॉ. राधेश्याम अग्रवाल, विजयसिंह बैस, केवलचंद गौतम, माधव रहांगडाले, बुधराम काळे, नवीन कटरे, ताराचंद लांजेवार, शैलेंद्र चंदेल आदींनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन कटारे, देवेंद्र आहाके, यशराज बहेकार, दीपेश रहांगडाले, जितेंद्र चौधरी, अविनाश बन्सोड, अश्विन वंजारी, राकेश येल्ले, राहुल गौतम, कृष्णा बघेले, गौरव चन्ने, शशांक खापेकर, शुभम गाते, रामेश्वर करंडे, राजेंद्र कटरे आदी परिश्रम घेत आहेत.