42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ ओबीसी जनगणनेसाठी राजुरा येथे जनआंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद

ओबीसी जनगणनेसाठी राजुरा येथे जनआंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद

0
41

blank

चंद्रपूर,दि.14ः-ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी या मुख्य मागणीला घेऊन जिल्ह्यातील राजुरा येथे मराठा सेवा संघ शाखेच्यावतीने शुक्रवारला(दि.13) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत OBC जनगणना आंदोलन घेण्यात आले.सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
या आंदोलनात ॲड. अंजली साळवे, दिनेश पारखी, बळिराज धोटे, वंदना गौरकार, उज्वला जयपुरकर, लता ठाकरे, मेघा धोटे, प्रिती रेकलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
खेड्या पाड्यातून या आंदोलनासाठी लोकांची हजेरी लावली होती. भारताची 2021 ची जनगणना होऊ घातली असून त्यामध्ये OBC समाजातील जातींचा नोंदणीसाठी कॉलम नसल्यामुळे आमचा जनगणनेत सहभाग नाही. OBC ची जनगणना करण्यात यावी या मुख्य मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आले. अरे! आता तरी म्हणा, करा OBC जनगणना. जय OBC, जय संविधान या नाऱ्यांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.
जनगणना 2021 मध्ये OBC चा कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही ही मोहीम अंजली साळवे यांनी संविधान दिनापासून सुरू केली. त्याला प्रत्येक ठिकाणाहून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पाट्या लावा मोहिमेची युवकांमध्ये मोठी क्रेज दिसून येत आहे. युवक पाटीसोबत मोठ्या संख्येने फोटो काढून या मोहिमेला प्रतिसाद देत आहे.
जर भारत सरकार येणाऱ्या 2021 च्या जनगणनेत OBC च्या कॉलमचा समावेश करणार नसेल तर OBC समाज या जनगणनेवर असहकार चळवळ राबविण्याचे आव्हान या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आले.
आंदोलन यशस्वीतेसाठी संभाजी साळवे, लक्ष्मण तुराणकर, संतोष रामगिरवार, वंदना पारखी, कांचन तुराणकर, विना साळवे, शालिनी बोबडे, ताई बोबडे, संगीता बोबडे, माया धोटे, वर्षा भगत, सिंधू बोबडे, श्रुती मोहितकर, सपना घटे, विद्या रागीट, प्रतीक डाखरे, विशाल शेंडे, उत्पल गोरे, सुरज भंबेरे, सचिन मोरे, श्रीकांत मोरे, शुभम धवस, मधुकर डांगे, लक्ष्मण घुगुल, बाबुराव मुसळे, बंटी मालेकर, रवी डाहूले, दिपक मडावी, स्वप्नील शेरकी, अमोल राऊत, मधुकर मटाले, विनोद बोबडे, समाधान लडके, दिलीप गिरसावळे, ए. डि. एकडे, रतन काटोले, केतन जुनघरी, कार्तिक बोबडे इत्यादींनी प्रयत्न केले.

blank