29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ देशातील सर्व समाज घटकाना फुलण्याची संधी मिळाल्यास भारत समृद्ध व बलशाली होईल-डाॅ.साळुंखे

देशातील सर्व समाज घटकाना फुलण्याची संधी मिळाल्यास भारत समृद्ध व बलशाली होईल-डाॅ.साळुंखे

0
33

चंद्रपूर,दि.14ः-देशातील सर्व समाज घटकाना फुलन्याची संधी मिळाल्यास भारत समृद्ध व बलशाली होईल असे विचार ख्यातनाम साहित्यिक, प्रसिद्ध विचारवंत, प्राच्चविद्या पंडीत डॉ आ ह साळुंखे यांनी चंद्रपूर शहरातील प्रियदर्शिनी सभागृहात(दि.10) त्यांच्या अमृत महोत्सवी सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करतांना व्यक्त केले. येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.मंचावर विविध संस्था संघटनाचे प्रतिनिधी म्हणून जेष्ठ विधीज्ञ पुरुषोत्तम सातपुते, प्रा रमेशचंद्र दहीवडे, प्रा विजय बदखल, सुधाकर आडबाले, डॉ चेतन कुटेमाटे आडवोकेट फरहाद बेग,प्रा.सूर्यकांत खनके,प्रा.योगेश दूधपचारे,भास्कर मुन,सतीश मालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ साळुंखेंनी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्याबद्धल डॉ.आ.ह.साळुंखे अमृत महोत्सवी सत्कार समितीच्या वतीने त्यांचा मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाचे अध्यक्षपदी साहित्यिक प्रा.जावेद पाशा होते. सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक, उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व मानपत्र वाचन स्वागताध्यक्ष बळीराज धोटे यांनी केले. महाराष्ट्रभर होत असलेल्या सत्कार कार्यक्रमांची भूमिका डॉ.आ.ह.सरांचे सहकारी प्रा.अर्जुन जाधवर यांनी मांडली.
सत्कार समारंभात बोलतांना डाॅ.साळुंखे पुढे म्हणाले की, भारतात 130 कोटी मेंदू व 260 कोटी नवनिर्माण करणारे हात आहेत. देशातील जनतेला कोणताही भेदभाव न करता त्यांच्या त्यांच्या क्षमता वापरून फुलण्याची संधी मिळाल्यास भारत सर्व क्षेत्रात संपन्न व बलशाली होईल. इतिहास काळात जेव्हा जेव्हा भारतातील नागरिकांना त्यांच्या क्षमता फुलविन्याच्या संधी व्यवस्थित मिळाल्या तेव्हा तेव्हा भारत बलशाली झाला आहे. अशा संधी सम्राट अशोक व बौद्ध विचाराने आपल्या राज्याचा, देशाचा राज्यकारभार पाहणाऱ्या शासन काळात लोकांना मिळाल्या. मात्र त्या नंतर आलेल्या राजकीय शक्तीनी देशात चातुर्वर्ण व्यवस्था सुरु करुन लोकांच्या फुलण्याच्या संधी बळजबरीने नाकारल्या त्यामुळे मागील हजारो वर्ष भारत गुलामीत जगत होता. स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या लोकशाही सरकारने लोकांना संविधानाने दिलेल्या फुलण्याच्या संधी नाकारल्या त्यामुळे देशातील विविध समाज घटकामध्ये कमालीचा असंतोष दिसतो असे डॉ साळुंखे म्हणाले. या प्रसंगी डॉ.आ.ह.साळुंखेंचा विविध संस्था व संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रारंभी कौरासे व संजय नासीरकर यांनी स्वागतगीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रा रविकांत वरारकर यांनी केले.

 

blank