32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ डिसेंबर अखेर पर्यंत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करा-सीईओ डॉ. राजा दयानिधी

डिसेंबर अखेर पर्यंत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करा-सीईओ डॉ. राजा दयानिधी

0
42

blank

गोंदिया,दि.14 : वैयक्तीक शोचालय प्रत्येक कुटूंबासाठी गरजेचा असून, लाभार्थ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधि यांनी केले आहे. जिल्हा परिषद सभागृहात शुक्रवारला (दि.१३)वैयक्तीक शौचालय बांधकामाचा गटविकास अधिकारी तथा विस्तार अधिकारी (पंचायत ) यांच्याकडून आढावा घेतला.यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यावेळी उपस्थित होते.
सन २०१२ च्या पायाभूत स्वहेक्षणातून सुटलेल्या (LOB) लाभार्थ्यांकडे शौचालय बनविण्यात येत आहेत. यासोबतच गावातील एकही लाभार्थी शौचालयाविना राहू नये (NOLB) असे शासनाचे निर्देश आहेत. गोंदिया जिल्हयातील आमगाव, अर्जुनी मोरगाव, देवरी, गोरेगाव, गोंदिया, सडक अर्जुनी,सालेकसा आणि तिरोडा या आठही पंचायत समिती अंतर्गत ६९२६ वैयक्तीक शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट पूर्ण करावयाचे आहे. दरम्यान लाभार्थ्यांकडे वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करून निधी वाटप करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.प्रत्येक घरी शौचालय असावेच गावातील एकही व्यक्ती शोचालयाविना राहू नये, असे शासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने NOLB अंतर्गत यादी तयार करून त्यांचे बांधकाम सुध्दा करण्यावर भर देण्यात आलेला आहे. तथापि ज्या व्यक्तींकडे शोचालय नाही आणि ज्यांचे नाव पायाभूत सर्वहेक्षणातील वगळलेल्या यादीत नाहीत अशा कुटूंब प्रमुखांना NOLB अंतर्गत लाभ देता येणार आहे.ग्रामपंचायतीमध्ये असे लाभार्थी असल्यास त्यांनी ग्रामपंचायतींना शौचालयाची मागणी करावी. तथा ग्रामपंचायतींने त्यांचे नाव केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करून त्यांचे नियोजित कालावधीत बांधकाम पूर्ण करून घेण्याचे निर्देश पंचायत समितींना यावेळी देण्यात आले.
उल्लेखनीय म्हणजे, ३१ डिसेंबर नंतर कोणत्याही शोचालयाचे अनुदान देण्यात येणार नाही. सदर निधी शासनाला परत पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे नियोजित कालावधीत शौचालय बांधकाम करणे गरजेचे आहे. दरम्यान ग्रामपंचायतस्तरावर बैठका, गृहभेट देण्याचे निर्देश आढावा बैठकीत देण्यात आले आले. विस्तार अधिकारी पंचायत यानी त्यांच्या संपर्काच्या ग्रामपंचायतींचे उद्दीष्टय पूर्तीसाठी विशेष परिश्रम घ्यावे.दरम्यान ज्या ग्रामपंचायतींचे वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण होणार नाही,त्या ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक तथा संबधित सर्वच व्यक्तींवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

blank