29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जनप्रतिनिधींचा अपमान खपवून घेणार नाही :आ. रहांगडाले

जनप्रतिनिधींचा अपमान खपवून घेणार नाही :आ. रहांगडाले

0
35

तिरोडा,दि.16,-शासकीय योजना व सामूहिक लाभाच्या योजना राबविण्याची जबाबदारी अधिकारी व कर्मचाèयांची आहे. ही जबाबदारी काही अधिकारी व कर्मचारी योग्य रीत्या पार पाडत नसल्याने नागरिकांनी निवडून दिलेल्या जनप्रतिनिधींना पंचायत समितीच्या फेèया माराव्या लागतात. अनेकदा त्यांना अपमानास्मद वागणूक दिली जाते.असा अपमान खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी आमदार विजय रहांगडाले यांनी पंसच्या अधिकारी व कर्मचाèयांनी दिली.
शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी पंस सभागृहात आयाोजित आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी पंस सभापती नीता रहांगडाले, उपसभापती मनोहर राऊत, पंस सदस्य डॉ. किशोर पारधी, पवन पटले,खंडविकास अधिकारी सचिन लिल्हारे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी हास्मी, लघु पाटबंधारेचे उपअभियंता अनंत जगताप, गटशिक्षणाधिकारी पारधी, माजी जिप उपाध्यक्ष मदन पटले प्रामुख्याने उपस्थित होते. सभेत तालुक्यातील अनेक गावांच्या सरपंचांनी आमदार रहांगडाले यांच्यासमोर समस्या मांडल्या. रमाई, शबरी व पंतप्रधान घरकूल
लाभार्थींचे अनेक महिन्यांचे हप्ते मिळालेले नाहीत. घरकुले पूर्ण झाली असताना अंतिम देयके दिली गेली नाहीत, काही लाभार्थींची घरकुले अर्धवट असतानाही त्यांना अनुदान देण्यात आले, पंचायत समितीद्वारे मंजूर याद्यांमध्ये फेरफार करून नियमबाह्य बदल करण्यात आला. घरकूल विभागातील अधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासत काम करतात, मग्रारोहयोंतर्गत कुशल कामांची गत तीन वर्षांची देयके मिळाली नसून, ग्रामपंचायतींतर्फे पाठविलेले नियोजनाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यास व जिपकडून मंजूर झालेल्या कामांतही अडथळे निर्माण केले जातात. याबाबत सरपंचांनी विचारणा केल्यास त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे सांगितले गेले. आपले म्हणणे मांडताना प्रभारी प्रकल्प अधिकाèयांनी चढ्या आवाजात प्रश्न विचारणाèया महिला सरपंचांनाच उलट प्रश्न विचारला. या प्रकारामुळे सभागृहाचा अवमान होत असल्याचे लक्षात येताच सभेचे अध्यक्ष आमदार रहांगडाले यांनी हस्तक्षेप करून प्रकल्प अधिकाèयाला महिला सरपंचाची माफी मागण्यास सांगितले असता त्यांनी महिला सरपंचाची माफी मागितली.तातडीने कामाला लागा सभेच्या समारोपप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी, तालुक्यातील जास्तीत जास्त मजुरांना कामे मिळावी, यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे तसेच उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रस्ताव मंजूर करवून घेण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष देणार आहे.

blank