24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home मराठवाडा/खान्देश विडा येथील शिक्षक अपघातात जागीच ठार

विडा येथील शिक्षक अपघातात जागीच ठार

0
32
केज,दि.16 :-राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे केज तालुक्यात अनेकांचे बळी गेले आहेत.आज विडा येथील हनुमान विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब रामराव घुटे यांचा केज बीड रस्त्यावर असलेल्या साखर कारखान्याजवळील डोनगाव फाटा येेेथे  मोटारसायकल व क्रुझर जिपमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला.ही घटना बारा वाजण्याच्या सुमारास घडली. बाबासाहेब घुटे हे मोटारसायकल वरून केजकडे येत होते तर क्रुजर जिप केज कडून बीडकडे जात होती. समोरासमोर हा अपघात झाला आहे. या अपघात मध्ये घुटे जागीच ठार झाले आहेत तर त्यांचा मुुुलगा वैभव व पत्नी सुद्धा या अपघातात जखमी झाला आहे.  क्रुझर जिप पलटी झाली आहे. रस्ता कंपनीच्या निष्काळजीमुळेच असे बळी जात असल्याची चर्चा यावेळी त्यांचे नातेवाईक व उपस्थित असलेले बोलत होते. या रस्ता कामाने आजवर अनेकांचे बळी घेतले आहेत. मृतकाच्या मुलाला व पत्नीला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
blank