गडचिरोली,दि.16ः- जिल्हा परिषदेच्या सतरा पेंढरी गट्टा जि.प.गटाच्या पोटनिवडणूकीत कांग्रेसने आपल्याकडे ही जागा कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.काँग्रेसचे विनोद लेनगुरे यांनी 90 मतांनी निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे नलेश्वर कावळे यांचा पराभव केला. तर शिवसेनेचे सुनिल पोरेड्डीवार हे तिस-या स्थानावर राहिले.
कॉंग्रेसचे जिप सदस्य श्रीनिवास दुलमवार यांचे सदस्यत्व जात पडताळणी प्रमाणपत्रा अभावी रद्द झाल्याने 12 डिसेंबरला ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. आज 16 डिसेंबरला झालेल्या मतमोजणीत कॉंग्रेसने विजय मिळविला.या विजयामुळे जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे संख्याबळ 15 कायम राहिले आहे. जानेवारीत होणा-या जिपच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत याचा लाभ कॉंग्रेसला होऊ शकतो.दरम्यान कॉंग्रेसचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी व इतर पदाधिकारी यांनी विजयी ऊमेदवाराचे अभिनंदन केले आहे.





