
गोंदिया,दि.19ः-सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील विदर्भ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेच्याअध्यक्षासह दोन कर्मचाèयांनी खातेदारांच्या १ कोटी १० लाख ८७ हजार १९४ रुपयांची अफरातफर केल्याचे प्रकरण १६ डिसेंबर रोजी समोर आले.दरम्यान, या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी अध्यक्षासह दोन कर्मचाèयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
साखरीटोला येथील विदर्भ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा अध्यक्ष हा संस्थेचा स्वतःअभिकर्ता आहे. त्याने संस्थेतील एक महिला व पुरुष कर्मचाèयांशी संगनमत करून खातेदारांनी बँकेत जमा केलेल्या १ कोटी १० लाख ८७ हजार १९४ रुपयांची अफरातफर केल्याची बाब १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या आर्थिक वर्षाचे जिल्हा विशेष लेखा परीक्षण कार्यालयाद्वारे करण्यात आलेल्या लेखा परीक्षणातून समोर आली.संस्थाध्यक्षाने पतसंस्थेतून एक मोठी रक्कम कोणतेही ठोस कारण न दाखविता उचलल्याचे तसेच बोगस कर्जदार दाखवून रक्कमेची उचल केल्याची तसेच अभिकर्ता म्हणून खातेदारांकडून गोळा केलेल्या रक्कमेचा पतसंस्थेत भरणा केला नसल्याची बाब लेखापरीक्षणातून समोर आली आहे.
विशेष म्हणजे, जून २०१९ पासून संस्थाध्यक्ष व या प्रकरणातील दोन्ही कर्मचारी फरार आहे. दरम्यान, पतसंस्थेत अफरातफर झाल्याची बाब उघडकीस येताच, फिर्यादी लेखा परीक्षक राजेश पांडुरंग बावनथडे (प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी पतसंस्था आमगाव) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला
आहे. हे प्रकरण उघडकीस येताच खातेदारांमध्ये रोषासह भीतीचे वातावरण आहे.
याप्रकरणी सालेकसाचे ठाणेदार राजकुमार डुणगे यांनी सांगितले की, लेखा परीक्षकांच्या तक्रारीनंतर पतसंस्थेच्या अध्यक्षासह दोन कर्मचाèयांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या ही
पतसंस्था सुरू आहे. त्यामुळे ज्या खातेदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा नोटीस संस्थेच्या कार्यालयात लावणार आहे. यामुळे या प्रकरणातील साक्षीदारांची संख्या वाढू शकते. तसेच जिल्हा विशेष लेखा परीक्षण कार्यालयाद्वारे २०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणाचे काम सुरू आहे.त्यामुळे अफरातफर रक्कमेचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.




