29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता दोन घरातून १ कोटी ८५ हजारांचा सडवामोहफुल जप्त

दोन घरातून १ कोटी ८५ हजारांचा सडवामोहफुल जप्त

0
24

तिरोडा,दि.20ः-येथील संत रविदास वॉर्डातील दोन घरावर धाड टाकून पोलिसांनी १८ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास १ कोटी ९६ लाख ४५0 रुपयांचा मोहसडवा व मोहाची दारू जप्त केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
गस्तीवर असताना तिरोडा पोलिसांना रवीदास वॉर्डात अवैधरित्या मोहफुल दारू साठविल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी भूपेंद्र माणिक बरियेकर यांच्या घरावर धाड टाकली. यावेळी तो फरार झाला तर रुपेंद्र माणिक बरियेकर याला पोलिसांनी अटक केली व घरातून १४४ प्लास्टिक कॅनमध्ये ठेवलेला मोहसडवा, ४ ड्रममध्ये ठेवलेला मोहफूल दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १८ हजार ६00 रुपयांचा मुद्येमाल जप्त केला. तर मायाबाई बरियेकर यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत ८0 प्लास्टिक पोत्यात ठेवलेला मोहसडवा, १५ लिटर मोहफुल दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ६६ हजार ८५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दोन्ही कारवाईतील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार उध्दव उमाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षाक अमरसिंह बसावे, पोलीस कर्मचारी ज्ञानोबा श्रीराम, पंकज सव्वालाखे, प्रसन्या सुखदेवे यांनी केली.

blank