36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांसाठी निवासस्थानाचे वाटप जाहीर

मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांसाठी निवासस्थानाचे वाटप जाहीर

0
32

नागपूर, दि. 20 : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी निवासस्थानाचे वाटप सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.
त्यानुसार मुख्यमंत्री यांच्यासाठी वर्षा निवासस्थान, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी रामटेक, वित्त मंत्री जयंत पाटील यांना सेवासदन, गृह मंत्री एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन तर सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ.नितिन राऊत यांना पर्णकूटी हे बंगले वाटप करण्यात आलेले आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संकेतांक 20191202203522907 असा आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान म्हणून सागर बंगल्याचे वाटप करण्यात आले.

blank