गडचिरोली,दि.23: गडचिरोली जिल्ह्यातील मालडुगी गावातील महिलांना अधिक चांगले वैज्ञानिक प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्यांना पद्धतशीररित्या प्रशिक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन- MVSTF)ने महाराष्ट्र राज्य खादी आणि उद्योग बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
एमव्हीएसटीएफने सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती मोहिमेच्या (महाराष्ट्र स्टेट रुरल लाइव्हलीहूड मिशन – MSRLM) कार्यक्रमांतर्गत मधावरील प्रक्रियाकेंद्राची स्थापना केली होती व या उत्पादनासाठी एक ब्रँडही तयार केला होता. चीफ मिनिस्टर रुरल डेव्हलपमेंट फेलो (CMRDF)कडून घेण्यात आलेले अपार कष्ट आणि या प्रयत्नांना स्थानिक बचत गटातील दहा महिलांनी दिलेल्या प्रामाणिक प्रतिसादामुळे मालडुगी सारख्या दुर्गम गावामध्ये नैसर्गिक मधाचा एक ब्रँड निर्माण होऊ शकला. मधाच्या या ब्रँडचे नाव 'इकोव्हॅन' असून तो सध्या सहकारी भांडाराच्या रुपात चालविल्या जाणा-या महिला शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे स्थानिक बाजारपेठेत विकला जात आहे. बचत गटाच्या महिलांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी तसेच हा उपक्रम आणखी पुढे नेण्यासाठी महाबळेश्वर इथे दोन दिवसांच्या एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एमव्हीएसटीएफने महाराष्ट्र राज्य खादी आणि उद्योग मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गावातील दहा महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
या महिलांच्या कौशल्यामध्ये भर टाकणे तसेच वैज्ञानिक आणि पद्धतशीर असे प्रशिक्षण त्यांना देऊ करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. यावेळी सहभागी महिलांना मधमाशी पालनाचे तंत्र शिकविण्यात आले. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रिसर्च ऑफिसर श्री. आर. पी. नारायणकर आणि महाराष्ट्र राज्य खादी आणि उद्योग मंडळाचे सुपरवायझर श्री.
महाडिक यांनी संस्थेचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मधमाशी पालन कशाप्रकारे केले जात आहे हे सांगितले. मधमाशी पालन आणि त्याचे महत्व तसेच हा उद्योग रोजगार निर्मितीस चालना देत उत्पन्नाचा स्त्रोत कशाप्रकारे बनू शकतो, यावर श्री. महाडिक यांनी थोडक्यात चर्चा केली. मधमाशी पालनामध्ये उपलब्ध मधमाशीच्या विविध प्रजातींची माहितीही त्यांनी समजावून सांगितली.
या कार्यशाळेतील सहभागींना प्रत्यक्ष जंगल भागात नेऊन मधमाशांची कृत्रिम पोळी बनविण्याकरिता मधुमाशी पालनाच्या पेट्या दाखविण्यात आल्या. ही पोळी कशी तयार होतात, कामगार माशा जवळपासच्या २ ते ३ किलोमीटरच्या अंतरावरील जंगलांमधून मध गोळा करून पेट्यांमध्ये कशा परततात, सर्वात आधी राणी माशीला पेटीत टाकण्याची गरज आणि
त्यानंतरच पोळी तयार होण्यामागचे कारण याची माहिती रिसर्च ऑफिसर श्री. नारायणकर यांनी दिली. महिलांच्या या गटाने मधावरील प्रक्रिया केंद्रालाही भेट दिली. मधाचे शुद्धीकरण कशाप्रकारे केले जाते, कच्च्या मधातील आर्द्रतेचा अंश कशाप्रकारे काढून टाकला जातो हे त्यांनी येथे पाहिले. महिलांनी मधाचे पॅकेजिंग आणि लेबलिंग करणा-या केंद्रालाही भेट देऊन पॅकेजिंगचा शेवटचा टप्पाही पाहिला.
या कार्यशाळेनंतर आता एमव्हीएसटीएफ या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी सज्ज आहे. आता पुढचे पाऊल म्हणून गावामध्ये पोस्ट प्रोसेसिंग युनिट उभारण्यावर म्हणजे मधावर प्रक्रिया केल्यानंतर त्याला बाजारयोग्य उत्पादनाच्या रूपात सिद्ध करण्यासाठीचे केंद्र स्थापन करणे यावर मुख्य भर असणार आहे. प्रामुख्याने अंतिम उत्पादनाला विशुद्ध स्वरूप देत
बाजारपेठेसाठी तयार करण्यासाठी या केंद्राची स्थापना केली जाणार आहे. हवामानातील बदल आणि मधमाशांची तिथे आढळणारी प्रजाती या कारणांमुळे संबंधित गावांतून गोळा केल्या जाणा-या मधामध्ये आर्द्रतेचे प्रमाण खूप अधिक असते. प्रक्रिया केंद्रामुळे या मधाचे अधिक चांगल्या प्रकारे विशुद्धीकरण होऊ शकेल तसेच त्यातील आर्द्रता काढून टाकून तो
बाजारपेठेत विकण्यासाठी तयार करता येईल.ग्रामस्थांसाठी सर्वात चांगली बातमी म्हणजे, मधावर प्रक्रिया करण्याच्या कामाबरोबरच ग्रामस्थ आणि शेतक-यांना आपल्या
कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यांचे अधिक शुद्धीकरण करण्यासाठीही या केंद्राचा वापर करता येईल.एमव्हीएसटीएफच्या खास उपक्रमांसाठीच्या निधीमधून आमच्यासाठी लवकर आर्थिक मदत मिळेल. प्रक्रिया यंत्रणेचा वापर करून कृषी उत्पादनांचे शुद्धीकरण करून घेत या उत्पादनांना बाजारपेठेसाठी सज्ज करण्याकडे पाहण्याचा ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांचा दृष्टिकोनच या केंद्रामुळे बदलून जाईल, याची मला खात्री आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी अंदाजे रु.२,००,००० (दोन लाख रुपये) खर्च येईल आणि गावातील अधिकाधिक माणसे आपल्या फायद्यासाठी या केंद्राचा उपयोग
करण्यासाठी पुढे येतील, हा विचार उत्साहामध्ये भर टाकणारा आहे.या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे व या उपक्रमाची संकल्पना मांडणारे चीफ मिनिस्टर रुरल डेव्हलपमेंट फेलो (CMRDF – ग्राम परिवर्तक) म्हणाले.




