31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home क्रीडा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे २४ डिसेंबरला आयोजन

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे २४ डिसेंबरला आयोजन

0
42

वाशिम, दि. २४ : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा जिल्ह्यातील युवक व युकतींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मता, राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी २४ डिसेंबर २०१९ रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात स्पर्धात्मक व अस्पर्धामक असे दोन गट आहेत.

या महोत्सवाअंतर्गत लोकगीत, लोकनृत्य, एकांकिका, शास्त्रीय वाद्य वादन (सितार, बासरी, तबला, विणा, मृदुंग, हार्मोनियम {लाईट}), गिटार, शास्त्रीय गायन, भरतनाट्यम, कथ्थक, मनीपूरी, ओडीसी, कुचीपुडी, स्वयंस्फुर्त, वक्तृत्व कला बाबींच्या सहभाग राहणार आहे. युवा महोत्सव स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे वय 15 ते 29 या वयोगटात असावे. तसेच गट तीन (सन 2015-16, 2016-17, 2017-18) वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी झालेल्या युवक युवतींना सहभाग घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी पत्रका द्वारे दिली आहे.

मणिपुरी, ओडिसा, भरतनाटयम, कथ्थ्यक, व कुचिपुडी  नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांना पुर्वी मुद्रित ध्वनिफीत कॅसेट साडीवर कार्यक्रम सादर कराता येईल. लोकगीत व लोकनृत्य य प्रकारातील गीते चित्रपट बाह्य असावेत. सहभागी कलाकांराना आवश्यक असणारे साहीत्य स्वत:च्या जबाबदारीवर आणावे. कार्यालयामार्फत फक्त स्टेज, विद्युत व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येईल. युवा महोत्सवात सहभाग घेण्यासाठी जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, संगीत विद्यालय यांनी आपल्या विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये विजयी स्पर्धकांना (प्रथम, द्वितीय, तृतीय) सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी केले आहे.