गोरेगाव,दि.24- मॉडेल कॉन्व्हेंट येथे वर्ग १ ते ७ च्या विद्याथ्र्यांकडून बालसभा कार्यक्रम साजरा करण्यात आला.मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव येथे नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन संस्थापक आर.डी.कटरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सहाय्यक शिक्षक आर.एम.कटरे, ओ.सी.बघेले हे उपस्थित होते. याप्रसंगी विद्याथ्र्यांनी रंगारंग कार्यक्रमाची प्रस्तुती दिली या बालसभेच्या माध्यमातून विद्याथ्र्यांचा सुप्त गुणांना वाव मिळतो. याकरिता शाळेमध्ये सतत असे कार्यक्रम साजरे केले जाते. अध्यक्ष आर.डी.कटरे यांनी बालसभेला उद्देशून विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. बालसभेमध्ये सहभागी झालेल्या विद्याथ्र्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या संचालिका सुरेखाताई कटरे, मुख्याध्यापिका छाया मेश्राम आणी एस.सी.पटले सहायक शिक्षिका प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.संचालन नमिता ठाकूर यांनी केले.कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.





