लाखांदुर,दि.24ः तालुक्यातील पाहुनगाव येथील एका युवकांने गळफास घेऊन आत्नहत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारला (दि.23) दुपारी १२ वाजता सुमारास घडली असून, कु.आशिष शिवराम बनकर (वय २३) रा.पाहुनगाव, पो.भागडी. ता.लाखांदूर असे मृतक युवकाचे नाव आहे.मृतक आशिष हा लग्नाला निघाला होता. त्यांने मुली पाहायला सुरवात देखील केली होती. ते तिघे भाऊ होते. मोठ्या भावाचे लग्न ठरल होते. दरम्यान सोमवारला आशिषने गावालगतच्या श्री.माटे यांच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्नहत्या केली आहे. सदरचा हा प्रकार रहदारीच्या लोकांनी पाहिला होता. त्यानंतर सदर घटनेची माहिती गावात व लाखांदुर पोलीसांना देण्यात आली होती. आशिषच्या आत्नहत्येच कारण गुलदस्त्यात असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्री.कुलसुंगे करीत आहेत.




