धामनगावरेल्वे,दि.25ः- धामनगावरेल्वे येथे संत शिरोमनी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने २४ डिसेंबरला संताजी कर्मचारी सहकारी पतसंस्था कार्यालयात संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतीमेचे पुजण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी संस्थेचे संस्थापक विजय साकोरे यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल गुल्हाने होते. गुल्हाने यांनी संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनाचे प्रसंग सांगीतले.संत तुकाराम महाराजांची गाथा व साहित्य इंद्रायनी नदीमध्ये बुडवल्यानंतर संताजीने आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर गाथा पुन्हा लिहून काढली. अभंग , किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले,असे विचार मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय शिरभाते ,आनंद हजारे,नरेन्द्र गुल्हाने,प्राचार्य बी.एम गाढवे,किशोर मेघरे,सुधिर चरडे,मुख्याध्यापक प्रमोद हटवार ,प्रा.दिपक अंबरते,प्रदिप अजमिरे व समाजबांधवांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव अविनाश चाफले यांनी केले.प्रास्तविक प्रा.दिपक अंबरते यांनी तर आभार व्यवस्थापक अशोक नागरमोते यांनी मानले.





