अंजनशिंगी,दि.25ःः येथील कान्होजीबाबा कनिष्ठ महाविद्याल, ग्रामपंचायत कार्यालय,गुरुदेव सेवामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थानी बस स्थानक परीसर,आठवडी बाजार,मुख्य रस्ते ,ग्रामपंचायत परीसर इ.ठिकाणी खराट्यानी स्वच्छता करुन कृतीतून गाडगेबाबांचे विचार अंगीकारण्याचा सल्ला कृतीतून दाखविला. गाडगेबाबांची शोभायात्रा महाविद्यालय ते ग्रामपंचायत अशी नेण्यात आली.घरासमोर सडा ,रांगोळ्या घालून पालखीचे स्वागत करण्यात आले.पालखीचे रुपांतर ग्रामपंचायत मधे भव्य प्रबोधनात्मक कार्यक्रमात झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अवधूतराव दिवे होते.प्रमुख अतिथी म्हणून मोतिराम ठोंबरे अध्यक्ष गु.सेवामंडळ,प्राचार्य बी.एम गाढवे,प्रमुख वक्ते पपिताताई मनोहरे,कैलास ठाकरे, प्रमुख उपस्थिती भोजराज हीवसे ,अशोक काळे,वासूदेव पदवाड,सचिव जोल्हे,नारायन मोहोड,विषाल ठाकरे ,सचिन भोंगाडे,बबन वाळके,सुरेश मेहकरे,रामदास वाळके,पुंडलीक ठाकरे, बबन भोयर,विजय ठाकरे,प्रा.किशोर देशकर , प्रा.मंजुषा बुरिले,प्रा.उज्वला चांबटकर,विनोद इंगोले ,रविन्द्र पवारसर ,सुभाष नांदणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अतुल ठाकरे यांनी केले प्रास्तविक प्रा.दिपक अंबरते व आभार गोपाळराव चांदूरकर यांनी मानले. ग्रामवासी व विद्यार्थांनी यावेळी उपस्थिती दर्शविली.





