आमगाव,दि.25ः- विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त भयमुक्त व काफी मुक्त परीक्षेला समोर गेल्याने पुढील आयुष्य यशस्वी होण्यात मदत होते असे विचार जिल्हा समन्वयक मिलिंद रंगारी यांनी व्यक्त केले.ते आमगाव तालुक्यातील राजीव गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडद येथे व्यवसाय व विकास मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. रंगारी यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शालांत प्रमाणपत्र परीक्षा विषयक व्यवसाय व विकास या संबंधाने सविस्तर मार्गदर्शन केले.पुढे म्हणाले की, आपला स्वतःचा कुटुंबाचा व शाळे मध्ये नाव लौकिक करून घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या एखाद्या विषयासंबंधी असलेली अभिरुची क्षमता व ते प्राप्त करण्याची संधी यांचा योग्य ताळमेळ बसवून विद्यार्थ्यांनी कलचाचणी च्या गुणावरून योग्य त्या क्षेत्राची निवड करावी तेव्हाच आपण यशस्वी ठरत असतो.
2019 -20 मध्ये येणाऱ्या दहावी व बारावी च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेला समोर जाताना विद्यार्थ्यांनी कुठल्याच प्रकारचा मनावर अभ्यासाचा शैक्षणिक साधनांचा किंवा इतर बाबींचा तान येऊ न देता तणावमुक्त परीक्षेला समोर जावे. तसेच परीक्षा देताना परीक्षेसंबंधी कोणतीही भीती न बाळगता भीती मुक्तपणे परीक्षेला समोर जावे.परीक्षा देताना पुढील आयुष्य यशस्वी व येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना समर्थपणे तोंड देण्याकरिता कॉपीमुक्त परीक्षा देणे गरजेचे असल्याचे सांगितले.विविध प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नांचे संवादात्मक चर्चा उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ए टी डुंबरे होते. आर.एस.डोंगरे,एस.एम.बारसे,एच. राणे,बोपचे मॅडम,टेंभुर्णीकर मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी एम.एस.परिहार,आर.एस. कागदीमेश्राम उपस्थित होते.





