33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ सीएए-एनआरसीच्या समर्थनात निघालेल्या रॅलीत भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींची हजेरी

सीएए-एनआरसीच्या समर्थनात निघालेल्या रॅलीत भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींची हजेरी

0
48

गोंदिया,दि.25ः-नागरिकत्व नाकारलेल्या शेजारील देशांमधील जनतेला देशात स्थान देण्यासाठी केंद्र सरकारने नुकत्याच मान्यता दिलेला नागरिकत्व कायद्याचे समर्थन करण्यासाठी गोंदियामध्ये आज निघालेल्या भव्य मोर्चामध्ये भारतीय जनता पक्ष आणि पक्षासी संबधित सर्वच संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.विशेष म्हणजे भाजपचे आमदार,खासदार व जिल्हाध्यक्षापासून सर्वच पदाधिकारी सहभागी झाले होते.येथील हनुमान मंदिर परिसरातून सकाळी निघालेली रॅली शहरातील मुख्य मार्ग भ्रमण करीत गोरेलाल चौक,मार्गे गांधी प्रतिमा होत जयस्तंभ चौकात पोचली.या रॅलीत  खासदार सुनील मेंढे,आमदार डॉ.परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले,आमदार विनोद अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माडी आमदार रमेश कुथे,डाॅ.प्रशांत कटरेसह मोठ्याप्रमाणात नेते  तसेच नागरिक सहभागी झाले होते.त्यानंतर झालेल्या जाहिर सभेत नागरिकत्व मिळणाऱ्या आमच्या बंधू, भगिनींसाठी कायदा करणाऱ्या केंद्र सरकारच्या पाठीशी देशातील सर्व नागरिक ठाम पणे पाठीशी उभे असल्याचे विचार सर्वांनी व्यक्त केले.