तिरोडा,दि.26ः- तालुक्यातील सरांडी येथे आज कंटनेरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सायकांळी 6.30 वाजता दरम्यान घडली.मृतकाचे नाव रतिराम बदने (वय 55)रा.सरांडी असे आहे.या अपघातात दखने हे कंटेनरच्या खाली चिरडला गेले.घटनेनंतर गावकऱ्यांनी कंटेनरला आग लावण्याचा प्रयत्न केला.परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेत आग विझवली.या अपघातामुळे तिरोडा तुमसर मार्गावरील विहीरगावजवळ रस्ता जाम झालेला आहे.




