25.2 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home विदर्भ ३ जानेवारीला महिता मुक्ती पर्व कार्यक्रमाचे आयोजन

३ जानेवारीला महिता मुक्ती पर्व कार्यक्रमाचे आयोजन

0
57

गोंदिया,दि.०२ः-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंती निमित्त महिला मुक्ती पर्व कार्यक्रमाचे ३ जानेवारी शुक्रवारला मैत्रय बुध्द विहार भिमनगर मैदानावर सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जंयती समारोह समिती महिला संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उदघाटन बुध्दिस्ट इंट्रप्रेनर असो.ऑफ.कॉमर्स एण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष रत्नदीप काबंळे यांच्या हस्ते राजरत्न आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.वक्ते म्हणून आयटकच्या राज्य सहसचिव अ‍ॅड माधुरी राजन क्षिरसागर,स्विटी रत्नदिप कांबळे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमानिमित्ताने मोफत नेत्रतपासणी,मोतीqबदू शस्त्रक्रिया,रक्तदाब,मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे.बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.