गोरेगाव,दि.02ः- ग्रामीण भागात गोरगरीब रुग्णांना रोगाची तपासणी व औषधोपचार करणे अत्यंत कठीण जाते. वेळेवर औषधोपचार न मिळाल्यास आजार वाढत जातोव प्रसंगी मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरिबांना रुग्नसेवा देणे हीच खरी इश्वर सेवा आहे, असे प्रतिपादन जे. डी. जगणित यांनी केले.
तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील नरसिंह विद्यालयात २९ डिसेंबर रोजी परिसरातील ग्रामीण नागरिकांसाठी माजी जिप सदस्य खुमेंद्र मेंढे व जे. डी. जगणित यांच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आाले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंस सदस्य ललिता बहेकार, सरपंच अलका पातोडे, सरपंच प्रफुला दिहारी, मुख्याध्यापक सी. सी. वड्ढहाडे प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, डॉ. विनोद मोहबे व त्यांच्या चमूने रुग्णांची तपासणी केली. यात रक्त व मुत्र तपासणी डॉ. संजय माहुले, सांधे संदभार्तील आजारावर डॉ. मनिष पंधरे, डॉ. विजय कटरे यांनी डोळे अशा एकूण १२0७ रुग्नांची तपासणी करुन औषधोपचार केले. विशेष म्हणजे, योळी सरस्वती श्रीराम केवट या महिलेची प्रकृती नाजूक असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.





