25.5 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home विदर्भ विदर्भात मुसळधार पावसासह जोरदार गारपीट, पिकांचे मोठे नुकसान

विदर्भात मुसळधार पावसासह जोरदार गारपीट, पिकांचे मोठे नुकसान

0
77

नागपूर,दि.02- नववर्षाच्यी सुरुवात राज्यात अवकाळीने झाली आहे. राज्यातील नागपूर, अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसासह जोरदार गारपीटी झाल्याने शेतकरी परत एकदा संकटात सापडला आहे. पावसासहामुळे जिल्ह्यातील इसपूर, झिपला, बोरी, मेंडकी, चिखली, गोधनी येथे पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच, रात्री 2 वाजता जोरदार गारपीट झाले त्यामुळे मोसंबी, संत्रा, कापसाचे तसेच गहू, चना पिकांचेही नुकसान झाले. विदर्भातील नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट तर गोंदिया,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली नांदेड, हिंगोलीत मुसळधार पावसाने झोडपले आहे.मंत्री अनिल देशमुख यांनी गारपिटग्रस्त भागातील पिकांची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.तिकडे अमरावती जिल्ह्यातील मंत्री यशोमती ठाकूर यांनीही नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्दश दिले आहे.blank

नागपूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काटोल तालुक्यात खापा परिसरात पहाटेच्या सुमारास गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या या गारपिटीमुळे काही घरांच्या छताचेही नुकसान झाले आहे. या गारपीटीमुळे गहू, चना पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी कडाक्याच्या थंडीने जोर पकडला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने थैमान घातले आहे, काही भागात गारपीटही झाली. आधीस संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीने मीठ चोळण्याचे काम केले आहे.तिकडे भंडारा गोंदिया जिल्ह्यात या अवकाळी पावसामुळे शासकीय धान खरेदी केंद्राबाहेर असलेल्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस येत असल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे.