गोंदिया ,दि.03: ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी, या उद्देशानेरविवार, 5 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता मयुर लॉन कटंगी येथे जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्याबैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक संघटना एकाच मंचावर एकवटणार आहेत. 2021 मध्येहोणाऱ्या जनगणनेला एप्रिल 2020 पासून सुरुवात होत असून केंद्र सरकारच्या वेबसाईटवरपत्रक बघितले असता ओबीसी समाजाचा स्वतंत्र रखाना नसल्याचे आढळले. त्यामुळे ओबीसी वर्गाच्याप्रत्येक स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारद्वारे 31 ऑगस्ट 2018च्या भूमिकेवरून घुमजाव केले असून पुन्हा एकदा ओबीसी समाजाला धोका देण्याचा मानस सरकारचाअसल्याचे लक्षात आले आहे. आता मात्र शेतकरी-कष्टकरी समाज व त्यांची मुले-मुली अन्यायकदापिही सहन करणार नाही. या विरोधात सर्वच स्तरातून आवाज उठत असून आता जनगणनेसाठी ओबीसींचीशक्ती एकत्र करून गाव, तालुका, जिल्हा स्तरावर मुठ बांधून प्रतिकार करण्यासाठी ओबीसीकर्मचारी एकवटला आहे. ओबीसी आंदोलनाला शक्ती प्रदान करून आपली नैतिक व सामाजिक जबाबदारीतसेच संवैधानिक अधिकार ओळखून पुढील नियोजन, संघटनात्मक लढा, ओबीसी आंदोलनकर्ते कार्यकत्र्यांनापाठबळ देण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सर्व जि.प. राज्य सरकारी, निम सरकारी व सर्वशिक्षक संघटनांनी एकत्र लढा पुकारण्यासाठी येत्या रविवारला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सर्व ओबीसी, एनटी कर्मचाऱ्यांनी आपली सामाजिक, संविधानिक जबाबदारी समजूनआपले व आपल्या ओबीसी समाजाचे भविष्य वाचविण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती करण्यातआली आहे. सर्व संघटनांतील ओबीसी, एनटी कर्मचारी समिती, म.रा. प्राथमिक शिक्षक संघ,म.रा. पुरोगामी शिक्षक सहकारी संघटना, म.रा. शिक्षक भारती, अखिल भारतीय प्राथ. शिक्षकसंघ, विदर्भ प्राथ. शिक्षक संघ, विदर्भ माध्य. शिक्षक संघ, म.रा. माध्य. शिक्षक परिषद,मागासवर्गीय शिक्षक संघटना, जुनी पेन्शन संघटना, ग्रामसेवक युनियन, गोंदिया जिल्हातलाठी युनियन, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, पदवीधर संघटना, विषय शिक्षक संघ, गोंदियाजिल्हा मुख्याध्यापक संघ आणि इतर सर्व संघटनांमधील ओबीसी, एनटी कर्मचाऱ्यांनी सभेलान चूकता उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





