25.7 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकाच दिवशी 264 प्रकरणांचा निपटारा

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकाच दिवशी 264 प्रकरणांचा निपटारा

0
31

गोंदिया, दि.03::  वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबीत असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली निघावी याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे यांचे मार्गदर्शनाखाली नुकतेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये सर्वच प्रकारच्या तडजोडपात्र न्याय प्रविष्ठ व पूर्व न्याय प्रविष्ठ प्रकरणाकरीता तसेच पाणी, विद्युत, टेलिफोन व लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यात एकूण न्यायालयात प्रलंबीत प्रकरणांपैकी 1351 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी 134 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. तसेच पुर्व न्यायप्रविष्ठ 3341 प्रकरणांपैकी 130 प्रकरणे निकाली काढण्यात आली. असे एकूण 4692 ठेवलेल्या प्रकरणांपैकी 264 प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला व 1,66,59,656 रुपयांची वसुली करण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाली. यामुळे बऱ्याच पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे. या लोक अदालतीची विशेष बाब म्हणजे विद्युत, पाणी, टेलिफोन यांचे पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधीत विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची संपवण्यात आली. यामुळे संबंधीत विभाग व थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च व मानसिक त्रास वाचला.

न्यायालयात प्रलंबीत असलेली प्रकरणे तसेच पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याकरीता गोंदिया येथे जिल्हा न्यायाधीश-1 एस.बी.पराते व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.जी.जोशी, जिल्हा न्यायाधीश-2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.जे.भट्टाचार्य, मुख्य न्यायदंडाधिकारी एन.आर.वानखडे, सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) जे.एम.चौहान, सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) श्रीमती आर.डी.पुनसे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व्ही.आर आसुदानी, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व्ही.आर.मालोदे, चौथे सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) पी.सी.बछले, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व्ही.के.पुरी, सहावे सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) यांनी तसेच पॅनलवरील वकील ॲड.श्रीमती मंगला बन्सोड, ॲड.श्रीमती अर्चना नंदघळे, ॲड.श्रीमती एम.पी.चतुर्वेदी, ॲड.श्रीमती पिंकी जमरे, ॲड. वैशाली उके, ॲड. कौशल्या खटवाणी, ॲड. नीना दुबे, ॲड. सुनिता चौधरी, ॲड. दर्शना रामटेके, तर सामाजिक कार्यकर्ता श्रीमती सविता बेदरकर, श्रीमती संगीता घोष, आर.डी.बडगे, श्रीमती सविता तुरकर, श्रीमती मोनिता राणे, श्रीमती निशा भुरे, श्रीमती आशा ठाकुर, आर.टी.बघेले, मधुकर नखाते यांनी सहकार्य केले. या लोकअदालतीच्या यशस्तीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी तसेच पॅरा लिगल व्हालंटीअर्स यांनी परिश्रम घेतले.