मोहाडी,दि.03ः- सरपंचांच्या समस्या आपल्याला कळाले असून आपण सरपंच संघटनेच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध राहू, असे आश्वासन खासदार प्रफुल पटेल यांनी दिले.
सरपंच सेवा महासंघ जिल्हा भंडाराच्या वतीने गुरुवारी (दि.२) खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया निवासस्थानी निवेदन देण्यात आले. त्यात मुख्य मागणी भंडारा, गोंदिया व इतर जिल्ह्यातील रोहयो योजनेतील कुशल कामाचे २ वर्षातील थकीत देयक तात्काळ देण्यात यावे या मागण्यांसह २१ कलमी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सदाशिव ढेंगे, सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र यांनी दिले. त्यावेळी नेरीचे सरपंच आनंद मालेवार व अन्य पदाधिकारी हजर होते. यावेळी यावेळी खा. प्रफुल पटेल म्हणाले की, सरपंच यांची व्यथा आपल्याला कळत आहे आणि आपण सरपंच यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्यक्रम देऊ, तसे शासनाला कळवू. जनतेचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत, असे आश्वासन दिले. तसेच खेडे गावातील छोट्या छोट्या समस्या खा. प्रफुल पटेल यांनी जाणून घेतल्या.





