29.6 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ बोरटोला येथे माना समाजबांधवांची नाग दिवाळी उत्साहात

बोरटोला येथे माना समाजबांधवांची नाग दिवाळी उत्साहात

0
28

नवेगावबांध(सतिश कोसरकर)दि.03ः– माना जमातीच्या विरांगणा मुक्ताई व वैरागडची गोरजाई आणि माना जमातीची आराध्यदैवत माँ माणिका यांच्या पुण्यस्मरणदिनी नाग दिवाळीचे आयोजन माना जमात मंडळाच्या वतीने बोरगाव येथे करण्यात आले होते. या दिवशी केले जाते.
नाग दिवाळी हा माना समाजाचा उत्सवाचा व पवित्र सण आहे. मुठ पूजा, डाहकं, खण ह्या विधी करुन घराभोवती दिव्यांची आरास मांडून नाग दिवाळी साजरी केली जाते. यातंर्गत शनिवार रेजी ग्रामस्वच्छता व सजावट, १00 मीटर ४00 मीटर दौड व महिलांच्या हळदी कुकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी माँ मणिकादेवीची मूठ पूजा करुन शोभायात्रा काढण्यात आली. दुपारी १२.३0 वाजता नाग दिवाळी उत्सवाचा शुभारंभ लोकपाल गहाणे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माना जमात समन्वय समिती नागपूरचे अध्यक्ष देवराव घोडमारे होते. या वेळी अतिथी म्हणून सरपंच शेवंता गुढेवार, सरपंच वैशाली राखडे, प्रा.डॉ. प्रदीप भानसे, बाजीराव तुळशीकर प्रामुख्याने उपस्थित होते. सायंकाळी सहभोजन व पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक व संचालन वसंत गुढेवार यांनी केले. तर आभार जितेंद्र गुढेवार यांनी मानले. यावेळी परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी
जयपाल नारनवरे, विनोद गुढेवार, वामन मानकर, दामोदर गुढेवार, किसन गुढेवार, धर्मेंद्र गजबे, केशव गुढेवार, मनीषा मानकर, पवन गुढेवार, राकेश वाघमारे, तिरतम्मा नारनवरे आदींनी पर्शिम घेतले.