29.6 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home राजकीय भाजपाच्या सात पं.स. सदस्यांचे राजीनामे

भाजपाच्या सात पं.स. सदस्यांचे राजीनामे

0
20

चामोर्शी,दि.0३,ःः चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती,उपभापतीपदाकरीता ३१डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीच्यावेळी उपसभापती पदाकरिता उमेदवार निवडीविषयीच्या चर्चेदरम्यान पं.स.सदस्या वंदना गौरकार यांना सोडून इतर भाजपच्या पं.स.सदस्यांमधुन उपसभापती पद देण्यात यावे, असे मत मांडण्यात आले होते. मात्र भाजपा पक्षाने आम्हा सर्व सदस्यांना भूलथापा देऊन वंदना गौरकार यांची उपसभापतीपदी निवड करीत मतदान करण्यास भाग पाडले होते. त्या विरोधात म्हणून  भाजपच्या सात पं.स.सदस्यांनी सभापतीकडे राजीनामे दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेला पं.स.सदस्य सुभाष वासेकर, विष्णु ढालि, चंद्रकला आत्राम, संगीता भोयर, रेखाताई नरोटे, विनोद मडावी, सुरेश कामेलवार उपस्थित होते.
चामोर्शी पंचायत समितीमध्ये भाजपचे तेरा व विरोधात पाच असे पक्षीय बलाबल असताना सर्व समितीने उपसभापती उमेदवार न ठरवता वंदना गौरकार याचे नाव निश्‍चित केले. पक्षाच्या दबावात येऊन आम्ही पक्षाचे सदस्य असल्याने विरोधी पक्षाचा उपसभापती होऊ नये, यासाठी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावे लागले. पक्षाने आमचा विचार न केल्याने आम्ही व्यथित होऊन  २ जानेवारी रोजी सुभाष वासेकर, विष्णू ढालि, चंद्रकला आत्राम, संगीता भोयर, रेखाताई नरोटे, विनोद मडावी, सुरेश कामेलवार या ७ पं.स.सदस्यानी सभापती भाऊराव डोर्लिकर यांच्याकडे राजीनामे सादर केले आहे.माजी प.स.उपसभापती आकुली बिश्‍वास यांनीही उपसभापती पदाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाजपातील वाद चवाट्यावर आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.