33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home गुन्हेवार्ता अखेर मोबाईल चोर देवरी पोलिसांच्या जाळ्यात

अखेर मोबाईल चोर देवरी पोलिसांच्या जाळ्यात

0
133

देवरी,दि.7- गेल्या जून 2019 मध्ये देवरी पोलिस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या मर्ग प्रकरणातील मृताचा मोबाईल फोन चोरीला गेला होता. त्या मोबाईल चोराला देवरी पोलिसांनी मोबाईल सह आज (दि.7) पकडून गजाआज केले.

पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये तालुक्यातील शिलापूर येथील वाघनदीच्या घाटावर काही कॉलेज मित्र पोहायला गेले होते. यामध्ये धृव उज्ज्वल (वय 19) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यामध्ये मृताचा मोबाईल चोरीला गेला होता. पोलिसात या घटनेची नोंद असल्याने देवरी पोलिस चोरट्याच्या मागावर होते.  आज सदर चोर पाळत असल्याने मोबाईलसह पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आरोपीला गजाआड केले.