39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home गुन्हेवार्ता गांज्याची तस्करी करणार पती पत्नी आरपीएफ टास्क टीमच्या जाळ्यात

गांज्याची तस्करी करणार पती पत्नी आरपीएफ टास्क टीमच्या जाळ्यात

0
35

गोंदिया,दि.08ः कोलकत्ता-मुंबई रेल्वे मार्गावरील दुर्ग -गोंदिया दरम्यान 7 जानेवारीला पुरी -अजमेर या रेल्वेगाडीतील एस 4 व एस 5 या कोचदरम्यान कर्तव्यावर असलेल्या सुरक्षाजवानाला महिला आणि पुरुष सामानामध्ये वारंवार अदलाबदल करीत असल्याचे लक्षात आले.त्यांच्या हालचालीवर नजर ठेवल्यावर ते संशयास्पद वाटल्याने त्यांची विचारपूस करण्यात आली.त्यामध्ये मलखान शंभुदयाल प्रजापती व शिवानी मलखान प्रजापती दोघेही राहणार खुरई मध्यप्रदेश असे नाव त्यांना सांगितले असता विष्णु पान मसालाच्या सामानात काय ठेवले असे विचारले असता पती पत्नी असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे रेल्वे सुरक्षाबल शिपाई नासिर खान यांना अधिक शंका आल्याने वरिष्ठ अधिकारी व रेल्वेप्रशासनाला माहिती दिली.त्यानंतर  विभागीय सुरक्षा आयुक्त रेसुब नागपूरचे आशुतोष पांडे आणि सहाय्यक सुरक्षा आयुक्त ए.के.स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी नंद बहादूर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विनीक मेश्राम, कॉन्स्टेबल जी.आर.मडावी,राजेंद्र रायकवार यांनी रेल्वेत कर्तव्यावर असलेल्या नासिर खान यांच्या देखरेखीत त्यांना गोंदिया रेल्वेस्थानकावर उतरवण्यात आले.रेल्वेचे तिकिट तपासनीस विनोद बावस्कर यांच्या समन्वयाने कोच क्रमांक 5 मधील बर्थ क्रमांक 36 व 37 मध्ये बसलेल्या महिला व पुरुषांना सामानासह रेल्वे स्टेशन गोंदिया येथे उतरविण्यात आले.त्यानंतर लगेच निळ्या रंगाच्या बँगमधील राजश्री पान मसाला लिहिलेल्या व पांढर्या रंगाच्या विमल पान मसाला लिहिलेल्या कापडी दोन बॅगची तपासणी करण्यात आली असता 04 नग बंडल सघन टेपींग केलेले पॅकेट व विमल पान मसाला लिहिलेल्या बॅगमध्ये 04 नग बंडल सघन टेपींग केलेले आणि 01 नग करीबॅगमध्ये खुल्या अवस्थेत अशाप्रकारे  05 नग पॅकेट हस्तगत करण्यात आले.त्याची तपासणी केली असता सुंगधित गांजा असल्याचे उघडकीस आल्याने नायब तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.एन. बरसागडे व शासकीय पंचासमक्ष कारवाई करुन पंचनामा करुन जप्त करण्यात आला.जप्त केलेला 9 बंडलमधील गांजा सुमारे 16 किलो184 ग्राम एवढा असून बाजारमुल्य 1 लाख  61हजार 840 रुपये एवढे असल्याने दोन्ही पतीपत्नीला ताब्यात घेत त्यांच्याविरुध्द रेल्वे पोलिसांनी  एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा क्र .०2/२०२० कलम २० (बी) (आय),8 (सी) गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणात अन्य तस्करांची नावे उघडकीस येण्याची शक्यता असून उपनिरीक्षक एम.पी.राउत , महिला आरक्षक रजनी शर्मा यांनी या तपास कार्यात काम सुरु केले आहे.