39.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home गुन्हेवार्ता कारवाईच्या भितीपोटी युवकाची आत्महत्या

कारवाईच्या भितीपोटी युवकाची आत्महत्या

0
25

गोंदिया,दि.16 : गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत फेसबुक वरील अश्लील पोस्ट प्रकरणी तपासणी दरम्यान आरोपीने युवकाचे नाव घेतल्याने त्या युवकाने पोलिसांची कारवाई व बदनामी या भितीपोटी आज (ता.१५) दुपारी एकोडी येथील शेतशिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हितेश सहादेव बिसेन (२४) रा. एकोडी असे मृत युवकाचे नाव आहे.सविस्तर असे की, एकोडी येथील सद्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या निवास बिसेन नामक युवकाने एक खोटी फेसबुक आयडी तयार केली. या आयडीवर त्याने एका मुलेचे अश्लिल चित्र पोस्ट केले. दरम्यान पोलिसात प्रकरण दाखल झाले. ताब्यात असलेल्या आरोपी युवकाने या प्रकरणातील साक्षीदार असलेला हितेश याने सहकार्य केल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी हितेशला पाचारण केले होते. पोलिसांची कारवाई व बदनामी या भितीतून घाबरलेल्या हितेशे आत्महत्या केली असावी, अशी चर्चा गावात सुरू आहे. तक्रारीवरून पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. पुढील तपास गंगाझरी पोलिस करीत आहेत. एकंदरीत फेसबूक वरील टाकलेली पोस्ट व त्यातून प्रत्येक्ष सहभाग नसतांनाही पोलिसांची होणारी कारवाई किंवा चौकशी व त्यातून होणारी बदनामी यामुळेच हितेशने आत्महत्या केली असावी, अशी शंकाही गावातील नागरिकांनी वर्तविली आहे.