36.5 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ ओबीसी कर्मचारी महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांंना निवेदन

ओबीसी कर्मचारी महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांंना निवेदन

0
25

गोंदिया,दि.29ःओबीसी कर्मचारी बांधवांच्या बिंदूनामावली,पदोन्नती व अनुशेष संदर्भातील समस्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत त्यामुळे ओबीसी कर्मचारी बांधवांवर सातत्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून अन्याय होत आहे. ओबीसी समाजातील शालेय विद्यार्थ्यांच्या व कर्मचारी वर्गाच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ गोंदिया तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.यात ओबीसी कर्मचारी संवर्गावर रोष्टर संदर्भात झालेला अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिले तसेच ओबीसीचा अनुशेष भरून काढणे,सर्व विभागातील ओबीसी संवर्गाची रिक्त जागेची माहिती पुरवणे,विनाअट 1 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे याविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ गोंदियाचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, जिल्हा सरचिटणीस रवी अंबूले, कार्यालयीन चिटणीस हेमंत पटले, कार्याध्यक्ष किशोर डोंगरवार, उपाध्यक्ष एन.बी.बिसेन, संघटक राज कडव, सुरेंद्र गौतम,मूख्यसल्लागार महेंद्र सोनवाणे, गोंदिया तालुकाध्यक्ष नरेंद्र गौतम ,गोंदिया तालुका सरचिटणीस सुनील लिचडे, सालेकसा तालुकाध्यक्ष राजकुमार बसोणे ,जिल्हा समन्वयक उत्तम टेंभरे, सालेकसा तालुका सरचिटणीस टि आर लिल्हारे,महेश केंद्रे यासह ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते