38.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रकने उडविले वाहतुक पोलिसाला

ट्रकने उडविले वाहतुक पोलिसाला

0
38

भंडारा,दि.17ः- प्रवासी वाहनाची तपासणी करत चालान फाडत असताना एका भरधाव ट्रकने मागेहून प्रवासी वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे वाहनाच्या समोर उभा असलेला वाहतूक पोलिस दूर फेकल्या गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव महामार्ग पोलिस चौकीजवळ घडली.
सुनील महादेव मेर्शाम (बक्कल नं. ५९) रा. बेला असे गडेगाव वाहतूक पोलिस केंद्रातील मृत पोलिस नायकाचे नाव आहे. रविवारी सकाळपासूनच सुनील मेर्शाम हे अन्य पोलिस कर्मचार्‍यांसोबत राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची तपासणी करीत होते. दरम्यान, त्यांनी एका प्रवासी वाहनाला थांबविले. त्या वाहनावर चालान फाडत असताना भंडाराकडून साकोलीकडे जाणार्‍या ट्रकने (क्र. एम. एच. १५ एफव्ही. ६१७७) प्रवासी वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की प्रवासी वाहनाच्या समोर उभे असलेले सुनील मेर्शाम रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. मृतकाला लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले. लाखनी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार मंडलवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.