31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय धोबीसराडच्या १८ जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

धोबीसराडच्या १८ जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
20

blank

देवरी ता.२२:: आदिवासीबहुल गाव म्हणून परिचित असलेल्या धोबीसराड येथील भारतीय जनता पक्ष, काँग्रेस व बहुजन समाज पक्षातील एकूण १८ कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अध्यक्षस्थानी गोंदिया जि.प. चे अध्यक्ष विजय शिवणकर होते. याप्रसंगी म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्‍वरी, देवरी तालुका राकाँचे अध्यक्ष महेशकुमार जैन, आमगाव देवरी विधानसभा आदिवासी नेते रमेश ताराम, वरिष्ठ कार्यकर्ते केशवराव भूते, सी.के. बिसेन, बंटी भाटिया, बबलू भाटिया प्रामुख्याने उपस्थित होते.या वेळी विविध पक्षातील १८ कार्यकर्त्यांनी राकाँ पक्षात प्रवेश केला.यात धोबीसराड येथील नितेशकुमार वालोदे, संदेश वालदे, प्रशांत आकरे, देवानंद शहारे, सुशांत सिंगोले, धरमदास अंबरवाडे, राज उईके, राजू पटले, दिनेश शर्मा, सोनू पटले, संजू उके, हसन बडोले, बिटलू चिमणकर, रेषपाल उईके, रविंद्र रहांगडाले, नितेश पंचभाई, पिंटू कटरे व दिपक कटरे आदींचा समावेश आहे. सर्वांचा पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पक्षाचा गमछा भेट देऊन स्वागत करण्यात आले.

blank