29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ गारपीटग्रस्तांना मदत करा राष्ट्रवादी

गारपीटग्रस्तांना मदत करा राष्ट्रवादी

0
19

blank

तिरोडा दि.४: जानेवारी ते मार्च या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपायी मिळावी या मागणीचे निवेदन माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील शेतकर्‍यांचे गहू, चना, लाखोळी, जवस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना अर्थसहाय्य मिळावे अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. याप्रसंगी दिलीप बन्सोड, जि.प. सदस्य पंचम बिसेन, जागेश निमजे, प्रेमकुमार रहांगडाले, पं.स. सदस्य संजय किंदरले, शंकर बिंझाडे, मीना पारधी, प्रभुदास पारधी, राजकुमार असाटी, घनशाम पारधी, खुशाल शहारे, महेंद्रसिंह चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

blank