गोंदिया,दि.20ः कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लाकडाऊन जाहिर करण्यात आले आहे.लाकडाऊनचा कालावधी एक महिन्यापेक्षा अधिक झाल्याने सामान्य जनतेला याचा फटका मोठा प्रमाणात बसला आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारात जनतेच्या आरोग्याची काळजी ज्या प्रमाणात जिल्हा प्रशासनाकडून घेतल्या जात आहे. त्याप्रकारे लाकडाऊनमुळे आर्थिकरित्या प्रभावित जनतेची काळजी घेऊन सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे, असे निर्देश राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकार्यांंशी चर्चा करताना दिले.विशेष म्हणजे खासदार पटेल यांनी महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेत रविवार 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आपल्या मुळ मतदारसंघ असलेल्या गोंदिया-भंडाराकडे धाव घेतली.तब्बल 14 तासाचा अंतर रस्तेमार्ग पुर्ण करीत रात्री 2 वाजेच्या सुमारास खासदार पटेल हे गोंदियात सपत्नीक दाखल झाले.
खासदार प्रफुल पटेल यांनी आज सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे व मुख्य कार्यपालन अधिकारी डाॅ. राजा दयानिधी या निवडक अधिकार्याशी चर्चा केली. यावेळी खासदार पटेल स्वतः सोशल डिस्टंसचे पालन करीत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी खासदार पटेल यांनी जिल्हा प्रशासनाकडून कोरोना हा संसर्गजन्य आजाराच्या या काळात जिल्हयातील सामान्य जनतेची परिस्थिती सोबतच जिल्हा प्रशासनाचे कार्य व उपाययोजना बाबद चर्चा केली. जिल्हयातील वैद्यकीय अधिकार्यांंची संख्या, औषधांचा साठा, अन्न धान्य वितरण, केसरी कार्ड धारकांना अन्न धान्याचा पुरवठा सोबतच स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्याची काळाबाजारी,शासकीय योजनांच्या निधीचे बँकेतून वाटप, जिल्हयात अडकलेल्या बाहेर गावातील नागरिकांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था, शिवभोजन थाली योजना, कायदा सुव्यवस्था आदी विषयावर चर्चा केली.
शहरात कोरोना आजाराची बाधा झालेल्या गणेशनगरातील नागरिकांना सवलत मिळावी, धान उत्पादक शेतकर्यांंना बोनस व प्रलंबित चुकारे त्वरित मिळावेत, गोदिया व तिरोडा नगर परिषदेकडून शहराची स्वच्छता, सैनीटाईजेशन करणे, संपूर्ण जिल्हयातील शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केन्द्र व त्या ठिकाणी नियुक्ती डाॅक्टरांची स्थिती, मानमोडी रोगामुळे धान, भाजीपाला, टरबुज आदी पिकांचे झालेल्या नुकसानीचा तातडीने सर्वे करुन शासनाला अहवाल सादर करावा व त्यांना तातडीची मदत मिळेल यासाठी कार्यवाही करावी. जिल्हयातील धान उत्पादक शेतकर्यांना बाघ – इटियाडोह सिंचाई व इतर सिंचन प्रकल्पाचे पाणी रबी हंगामाला देऊन पिक वाचविणे आदीं विषयांवर खासदार प्रफुल पटेल यांनी चर्चा केली. यावेळी खासदार पटेल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातूनच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंडारे यांचेशी धानाचे बोनस व प्रलंबित चुकारे यावर दुरध्वनीच्या माध्यमातून चर्चा केली. गोंदिया येथे कोरोना तपासणी केन्द्र सुरु करुन तपासणीची सुविधा उपलब्ध करुन द्यावे असे निर्देश दिले.
संकटाच्या काळात प्रशासन हेच सामान्य जनता आणि शेतकरुयांचे मायबाप आहे. आई वडिल आपल्या पाल्यांची ज्या प्रमाणे काळजी घेतात, त्या प्रमाणे जिल्हा प्रशासनाने जनता आणि शेतकर्यांची काळजी घेऊन त्यांना मायेचा आधार द्यावा, असे निर्देश खासदार पटेल यांनी दिले.




