वाशिम,दि.21ः-जिल्ह्यातील धनज पोलिस स्टेशनंतर्गत येत असलेल्या कूपटी येथे आज 21 एप्रिल रोजी व 20 एप्रिल रोजी पिपंळगाव बु.येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यात संचारबंदीचे उल्लंघनकेल्याप्रकरणात वर-वधूसह वऱ्हाडावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे.
सविस्तर असे की,कुपटी येथील रहिवासी प्रल्हाद मोकोडे यांची मुलगी वैशाली मोकोडे (19) चा विवाह अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील रहिवासी महादेवरवजी कंटाळे यांचा मुलगा मोहन कंटाळे (24) याच्याशी परवानगी शिवाय पार पडला.त्यातच संचारबंदी असल्याने पाच पेक्षा अधिक लोक या लग्नात असल्याचे लक्षात येताच पोलिस पाटील स्वाती निंघोट यांनी याविषयीची माहिती धनज पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कामरगाव चौकीत दिली.पोलिसांनीही वेळ न गमावात लगेच दखल घेत संचारबंदीचे उल्लघंन केल्याप्रकरणी वर वधूसह महादेवराव कंटाळे, शामरावजी कऱ्हाळे , प्रल्हाद मोकोडे,सौ. लता मोकोडे, सौ.माधुरी लसनकार या सर्वांवर कलम 188, 269 व साथ रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 च्या कलम 3 नव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कपिल म्हसके, रवींद्र राजगुरे , गजानन कदम ,शामल ठाकूर, दीपक खंडारे सुनील टाले करीत आहेत.
पिंपळगाव बु.येथील रहिवासी सै.शौकत सै. सैदू यांची मुलगी हजराणा परवीन (वय 20) हिचा विवाह अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी सै. रशीद सै. सैदहु यांचा मुलगा सै. मुजीब सै. रशीद सोबत 20 एप्रिलला पार पडला.या लग्नसमारंभासाठी 4 व्यक्तींची परवानगी देण्यात आली होती.परंतु त्यापेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याचे लक्षात आल्याने पिपंळगाव बु.येथील पोलिस पाटील संगीता राऊत यांनी पोलिसांनी माहिती दिली.त्यावरुन पोलिसांनी वर -वधू सह मौलवी हमीद खान शेर यांचावर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.





