24.5 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ उपविभागीय कार्यालयात एक खिडकी योजनेअंतर्गत कक्ष सुरु;ई-मेल आणि व्हाट्सआपवर अर्ज स्वीकारणार

उपविभागीय कार्यालयात एक खिडकी योजनेअंतर्गत कक्ष सुरु;ई-मेल आणि व्हाट्सआपवर अर्ज स्वीकारणार

अटी व शर्तीने मिळणार परवानगी व पासेस

0
311

गोंदिया दि.22: गोंदिया तालुक्याअंतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून विविध अत्यावश्यक जीवनोपयोगी वस्तूंशी संबंधित कामे,आस्थापना, उद्योग व शासकीय बांधकामे इत्यादी कामे सुरू करण्यास एक खिडकी योजनेअंतर्गत उपविभागीय कार्यालय गोंदिया येथे कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षातून अटी व शर्तीच्या अधीन राहून वरील कामे सुरू करण्यास परवानगी व पासेस देण्यासाठी उपविभागीय अधिकारी गोंदिया गोंदिया यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

गोंदिया नगरपरिषद हद्दीच्या बाहेर अत्यावश्यक जीवनोपयोगी वस्तूंशी संबंधित कामे, आस्थापना, उद्योग व शासकीय बांधकामे इत्यादी कामाकरिता अर्ज उपविभागीय अधिकारी गोंदिया यांच्या कार्यालयाच्या [email protected] या मेलवर किंवा 9326723342 या व्हाट्सआप क्रमांकावर पाठवावे.त्यानुसार अर्जाची छाननी करून परवानगी व पासेस देण्याबाबत आवश्यक कारवाई करण्यात येईल. कोणीही कार्यालयात येऊन अर्ज सादर करू नये.

20 एप्रिल 2020 नंतर विना परवानगीने परस्पर सुरू करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तू वगळता इतर आस्थापना, उद्योग,बांधकामे इत्यादी कामे चौकशीमध्ये सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. असे उपविभागीय अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.